सुरेश घाडगे
परंडा : परंडा नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सर्व २० जागा स्वबळावर लढवणार असल्याचे सांगून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन माजी आमदार राहूल मोटे यांनी परंडा येथे केले.
नगर परिषद निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शहरातील पदाधिकारी, आजी – माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांची बैठक मंगळवार ( दि. १२ ) माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या निवासस्थानी झाली.
बैठकीत बोलताना श्री मोटे म्हणाले कि, शहरात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यानी आत्तापासूनच निवडणूकीसाठी सज्ज रहावे. निवडणूक पुढे ढकलणी बाबत बोलले जात असले तरी गाफिल न राहता जाहीर झालेल्या निवडणुक नियोजन करावे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी तयारी करावी .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत सर्व जाती धर्माचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मतदार आहेत. प्रत्येक प्रभागात पार्टीची ताकद आहे. गत तीन निवडणुकात पार्टीने चढता क्रम ठेवला आहे. हि निवडणूक केलेल्या विकास कामावर व उर्वरीत विकास कामे करण्यासाठी श्री.मोटे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार आहोत. यावेळी २० हि जागांवर विजय मिळविण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आहे. त्यामुळे परंडा नगर परिषदवर वर्चस्व कायम रहाणार आहे, असा विश्वास माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी बैठकीत बोलताना व्यक्त केला.
यावेळी माजी नगराध्यक्ष जाकिर सौदागर, जि.प. माजी सभापती नवनाथ जगताप, युवा नेते विश्वजीत राहुल मोटे, न.प. माजी गटनेता शेरू सौदागर, बाणगंगा सहकारी साखर कारखाना संचालक भाऊसाहेब खरसडे, रा.काँ . जिल्हा उपाध्यक्ष धनंजय हांडे, ता. अध्यक्ष अॅड . संदीप पाटील, शहराध्यक्ष वाजीद दखनी, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे,सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष हनुमंत गायकवाड, दत्ता पाटील,मनोज कोळगे,मसरत काझी ,गोवर्धन शिंदे, धनाजी जाधव,बापू मिस्किन, संजय पवार, दीपक भांडवलकर,नितीन गाढवे,अनिल पाटील, महेश खुळे, सुरेश काशीद,पिंटू काळे, मलिक सय्यद, महेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक तालुका उपाध्यक्ष बंडू रगडे, आश्रु लेंगरे, दत्ता माळी, आप्पा बनसोडे, रामदास गवारे, सरफराज कुरेशी ,संजय घाडगे, बब्बू जिनेरी, राजा माने, शरीफ तांबोळी, आप्पा बनसोडे, जयंत शिंदे, पिंटू पाटील, सुभाष मारकड , जावेद मुजावर, तन्नू मुजावर, किरण डाके, संतोष वारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.