Jayant Patil : पुणे : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा (NCP leader Sharad Pawar has resigned) दिल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. राजीनामा मागे घेण्याच्या मागणीसाठी कार्यकर्ते आणि नेते (Activists and leaders are insistent) आग्रही आहेत. असे असताना मुंबईत ( Mumbai) होणाऱ्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (president Jayant Patil) यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे ते नाराज झाले आहे की काय अशी चर्चा रंगली आहे.
बैठकीला न बोलण्यावरु पाटील म्हणाले, ” राष्ट्रीय स्तरावरील बैठक असून, मला बोलावण्याची गरज वाटली नसेल ” असा त्यांनी नाराजीचा सूर काढला आहे. त्यामुळे पाटील हे आता नाराज असल्याचे बोलले जात आहे.
पाच वाजता राष्ट्रवादीची बैठक..
पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने समिती नेमली असून, त्या समितीची बैठक मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होणार आहे. मात्र, या बैठकीला जयंत पाटील हे उपस्थित नाहीत. ते पुण्यात एका कार्यक्रमाला आले असताना त्यांच्याकडे याबाबत विचारणा करण्यात आली असता पाटील म्हणाले, ‘ती राष्ट्रीय स्तरावरील बैठक आहे. मला बोलविण्याची कदाचित गरज भासली नसेल आणि प्रत्येक बैठकीला बोलवले पाहिजे, असा आग्रह नसावा.’
दरम्यान, माझे आणि सुप्रिया सुळे यांचे बोलणे झाले आहे. त्यामध्ये अशी बैठक झालेली नाही आणि बोलविण्यात आलेली नाही. माझे पवार यांच्याशीही बोलणे झाले आहे. सायंकाळी पाच वाजता बैठक होणार आहे. त्या बैठकीला मी पोहोचणार आहे” असे पाटील यांनी स्पष्ट केले. वज्रमुठ सभा ही उन्हाळ्यात घेणे अवघड होणार आहे. त्यामुळे एक मे रोजी रोजी झालेल्या अनौपचारिक बैठकीत तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे’ असेही पाटील म्हणाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Ajit Pawar : वेल्ह्याचे नामकरण राजगड करण्याची अजित पवार यांची शिंदे-फडणवीसांकडे मागणी..
Sharad Pawar : शरद पवारांना धक्का, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द