नवी दिल्ली : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ अर्थात ‘एनसीपी-एसपी’ या पक्षाला देणग्या गोळा करण्याची निवडणूक आयोगाने सोमवारी मुभा दिली.
लोकांकडून मिळणाऱ्या ऐच्छिक देणग्या स्वीकारण्याची परवानगी पक्षाला मिळावी, यासाठी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष व खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली ८ सदस्यीय शिष्ठमंडळाने सोमवारी निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. यानंतर निवडणूक आयोगाने लोकांकडून देणग्या किंवा निधी गोळा करण्याची परवागनी निवडणूक आयोगाने दिली. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळाला आहे.