पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल हॅक झाला आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
*** अत्यंत महत्वाचे ***
माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी. – सुप्रिया सुळे— Supriya Sule (@supriya_sule) August 11, 2024
सुप्रिया सुळे यांनी आज दुपारी एकच्या सुमारास पोस्ट करत म्हणाले, अत्यंत महत्वाचे, ‘माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी, असे सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले आहे.
सुळे यांनी ही पोस्ट करत जनतेला सावध राहण्यास सांगितले आहे. कोणीही त्यांना फोन किंवा मेसेज करुन नये असे त्या यावेळी म्हणाल्या आहेत.