Politics : राज्यात आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे. त्यासाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी बघायला मिळत आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी महायुतीतील जागावाटप आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याबद्दल मोठा दावा केला आहे. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस 80 जागांवर निवडणूक लढवेल. शंभर टक्के निवडून येणाऱ्या त्या 80 जागा निवडण्यासाठी पक्षानं राज्यभर सर्वेक्षण सुरू केल्याचा दावा आत्राम यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी महायुतीतील जागावाटप आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याबाबत मोठा दावा केला आहे. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस 80 जागांवर निवडणूक लढवेल. शंभर टक्के निवडून येणाऱ्या त्या 80 जागा निवडण्यासाठी पक्षानं राज्यभर सर्वेक्षण सुरू केलं असल्याचा दावाही आत्राम यांनी केला. आमचं टार्गेट 80 जागा लढवण्याचं असून त्यावर 100 टक्के निकाल मिळवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. राज्यात कुठे कुठे जागा निवडून येऊ शकते? त्या संदर्भात सर्वेक्षण आणि पक्षांतर्गत विचार विनिमय सुरू केल्याचं आत्राम यांनी म्हटलं आहे.
विदर्भात पक्षाचा 20 जागा..
विदर्भात पक्षाचा 20 जागा लढवण्याचा विचार असून, विदर्भातील सहा जागांवर आधीच आमचे आमदार आहेत. उर्वरित 14 कोणत्या असाव्यात? आणि त्या जागांवर कोणाला उभं करायचं? याचा विचार सुरू केला आहे. मात्र, प्रत्येक जिल्ह्यात किमान एक जागा तरी लढवण्याचा आमचा प्रयत्न असेन, असे मंत्री धर्मराव बाबा आत्राम म्हणाले. तसेच, शरद पवार गटाचे उमेदवार जिथे असतील त्या जागा प्राधान्याने आम्ही लढवू, असंही अत्राम यांनी सांगितलं आहे.
अनिल देशमुखांविरोधात विशेष प्लॅन..
दरम्यान, अनिल देशमुख यांच्या विरोधात अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा विशेष प्लॅन असल्याचा खुलासा ही आत्राम यांनी केला आहे. अनिल देशमुख विरोधात जर भाजपकडे सक्षम उमेदवार नसेल, तर आमच्याकडे देशमुख कुटुंबातूनच तगडा उमेदवार आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या विरोधात आम्ही एक देशमुखच उभा करू असा, दावाही त्यांनी केला आहे.