उरुळी कांचन : नवरात्र महोत्सवाचा पार्श्वभूमीवर सोरतापवाडी व पेठ (ता. हवेली) येथे धार्मिक, सांकृतिक सामाजिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याहस्ते मंगळवारी (ता.२७) मोठ्या उत्साहात करण्यात आले.
यावेळी माजी आमदार रमेश थोरात, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, संचालक विकास दांगट, पुणे जिल्हा राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदिप गारटकर, राष्ट्रवादी जेष्ठ नागरिक संघाचे राज्य प्रमुख सोनबा चौधरी, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना चाकणकर म्हणाल्या, शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव व व्रत आहे. हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. दुर्गा आणि राक्षस महिषासुर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी हा सण संबंधित आहे. वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी हा सण आहे. हे नऊ दिवस केवळ दुर्गा आणि तिच्या नऊ अवताराशी संबंधित आहे. असे चाकणकर यांनी सांगितले. तसेच महिलांची सुरक्षितता, त्यांचेवरील अन्याय, अत्याचार रोखणे, पिडीतांना न्याय महिला आयोगाच्या माध्यमातून मिळवून देणार आहे. असे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन करून सर्व नागरिकांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये होम मिनिस्टर, देवींच्या गीतांचा कार्यक्रम, महाराष्ट्राची लोकधारा, शिवशंभू व्याख्यान, लावण्या, डान्स व मिमिक्री, आणि कीर्तन या कार्यक्रमांचा समावेश आहे. या फेस्टिवलचे आयोजन अखिल सोरतापवाडी सार्वजनिक नवरात्र उत्सव कमिटीच्या व सुरज युवा प्रतिष्ठान आयोजित पेठ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी राष्ट्रवादी महिला अध्यक्षा भारती शेवाळे, हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, महिला तालुकाध्यक्ष सुरेखा भोरडे, सरपंच संध्या चौधरी, पेठचे सरपंच तानाजी चौधरी, नायगावचे सरपंच जितेंद्र चौधरी, माजी सरपंच सुरज चौधरी, उपसरपंच शंकर कड, ग्रामपंचायत सदस्य सनी चौधरी , अशोक चौधरी, सुहास चोरघे, रणजीत चौधरी फेस्टिवलचे पदाधिकारी, ग्रामस्थ व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.