Narayan Rane नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे वादाचे समीकरण आता नवीन राहिले नाही. ठाकरे गटाचे आणि राणे यांचे सातत्याने आरोपप्रत्यारोप रंगताना दिसून येते. राणे पिता पुत्रांवर टीका झाली अथवा त्यांनी केली की राजकारणात त्यांची चांगलीच चर्चा रंगते. अशातच एका ठाकरे गटाच्या एका नेत्याने मोठा दावा केल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.
ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी राणे यांचे दोन ते तीन महिन्यांमध्ये मंत्रीपद जाणार असल्याचे भाकीत केले आहे. तसेच हे केवळ भाकीत नसून वस्तुस्थिती असल्याचे देखील नाईक यांनी सांगितले आहे.
नाईक म्हणाले…!
“नारायण राणे यांचे शिवसेनेवर टीका करण्याचे काम होते. ते काम आता संपलेले आहे. त्यामुळे त्यांचं मंत्रीपद पुढील काही महिन्यांमध्ये जाणार आहे. असा दावाही त्यांनी केला. नाईक केलेल्या दाव्यानंतर राजकारणीत चांगलीच चर्चा रंगील आहे. आता राणे यावर कायप प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
नारायण राणेंना माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघातून त्यांच्या मुलाला उभे करायचे आहे. मात्र जनतेचा कौल हा उद्धव ठाकरेंसोबत आहे त्यामुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. असेही नाईक म्हणाले आहेत.
तर शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांवर बोलताना म्हणाले, जे आमदार आमच्यातून शिंदे गटात गेले आहेत ते आमदार आमच्यात पुन्हा येण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर अनेक आमदार परत येण्यास तयार आहेत. आमच्यातून गेलेल्या आमदारांना आता त्यांची खरी परिस्थिती कळालेली आहे. असा दावा देखील त्यांनी केला आहे.