पुणे : एका कार्यकर्त्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पाय धुतल्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे नाना पाटोले चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत, सर्व स्तरावरून त्याच्या या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला होता. आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे.
बावनकुळे यांनी पटोले आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे. तसंच महायुती आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही त्यांनी महत्वाचं विधान केल आहे. एका कार्यकर्त्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पाय धुतल्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यावर भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं आहे.
नाना पटोले इतक्या खालच्या पातळीवर गेले आहेत. शेतकऱ्यांना त्यांचे पाय धुवायला लावत आहे. अशोभनीय प्रकार नाना पटोले यांनी केला. इंग्रजांचा काळ काँग्रेसने परत आणला आहे. त्या काळातील मानसिकता नाना पटोलेंमध्ये उतरली आहे. नाना पटोले यांनी पदाचा अपमान केलेला आहे. त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
या पद्धतीचं वर्तण करणं हे शोभणार नाही..
तसेच बावनकुळे पुढे म्हणाले कि, 21 व्या शतकात चाललो आहोत, यातून काय संदेश समाजाला जाईल, या देशाने बघितले पाहिजे. पाय धुणारा असो की धुवून घेणारा असो.. या पद्धतीचं वर्तण करणं हे शोभणार नाही. भविष्यात त्यांची जे वृत्ती आहे बुद्धीभेद जो झाला. ती दुरुस्त केली पाहिजे, असं बावनकुळे म्हणाले आहेत.