दिनेश सोनवणे
दौंड : अलीकडच्या काळात वाढदिवस साजरा करणे हा खूप मोठा इव्हेंट झाला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने खूप मोठा खर्चही केला जातो. परंतु, दौंड तालुक्याचे कार्यसम्राट, लोकप्रिय आमदार ॲड. राहुल कुल यांचा उद्या रविवारी (ता.३० ऑक्टोबर) वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्त नागरिकांनी भेटीसाठी येताना केक, शाल, हार, बुके घेऊन न येता. शालोपयोगी शैक्षणिक साहित्य, वह्या पुस्तके भेट द्यावेत. असे आवाहन दौंड भाजप व आमदार राहुल दादा कुल युवा मंच यांच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.
वाढदिवस साजरा करताना नागरिक विनाकारण अवाढव्य खर्च करत असतात. हा अनावश्यक खर्च टाळून आपण समाजासाठी काही तरी देणे असते. या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत दौंड भाजप व आमदार राहुल दादा कुल युवा मंच यांच्या वतीने हा उपक्रम राबविला आहे. यातून जमा होणाऱ्या सर्व शैक्षणिक साहित्याचे वाटप आमदार ॲड. राहुल कुल यांच्या हस्ते गोर गरीब, होतकरू तसेच कोरोना महामारीत अनाथ झालेल्या विद्यार्थांना करण्यात येईल.
दरम्यान, वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून खूप दौंड भाजप व आमदार राहुल दादा कुल युवा मंच यांच्या वतीने चांगला उपक्रम राबवून समाजासाठी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचे सर्वांकडून कौतुक होत आहे.