Nagpur News : नागपूर : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आगामी काळात शिवसेनेच्या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी दोन दिवसांपूर्वीच केला होता. या पाच मंत्र्यांच्या कामकाजावर भाजपचे दिल्लीतील वरिष्ठ नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यामुळे या नेत्यांचा राजीनामा घेण्यास सांगितलं जाणार असल्याचा दावा खडसे यांनी केला होता. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील शिवसेनेच्या चार मंत्र्यांना येत्या मंत्रिमंडळ विस्तारात डच्चू दिला जाणार असल्याचा दावा केला. यामुळे खडसे यांच्या दाव्याला पुष्टी मिळाली. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे.(Earthquake in Maharashtra politics; Five ministers of Shiv Sena will get Dachhu? What did Chandrasekhar Bawankule say?)
भाजपचा कोण मंत्री व्हावा हे भाजप ठरवेल, शिंदे त्यांच्या पक्षाचं ठरवतील
या दाव्यांबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, मी गेली ३२ वर्षांपासून भाजपचा कार्यकर्ता आहे. हा पक्ष कोणाच्या अधिकारात हस्तक्षेप करेल, असं मला वाटत नाही. आता कोणाला मंत्री करायचे, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच ठरवतील. त्यांच्या पक्षात कुणाला मंत्रीपदावरुन काढायचं हा त्यांचा अधिकार आहे. (Nagpur News) भाजप कधीच कोणाला सल्ला देत नाही. हे युतीचं सरकार आहे. त्यामुळे भाजपचा कोण मंत्री व्हावा हे भाजप ठरवेल, शिंदे त्यांच्या पक्षाचं ठरवतील. शिवसेना आणि भाजप आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण व्हावी, यासाठी कुणीतरी ही गाजराची पुंगी सोडली आहे, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आळंदी येथे पालखी प्रस्थानप्रसंगी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केला. या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटले. याबाबत प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व राजकीय पक्षांना आवाहन केलं आहे की, याचं राजकारण करू नका.(Nagpur News) उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही अशीच घटना घडली होती, त्यावेळी कोणीही राजकारण केले नाही. फडणवीस यांनी घटनेबद्दल स्पष्टीकरण दिलेले आहे, ते पुरेसे आहे. सरकार आपल्या पद्धतीने कारवाई करत आहे, असे बावनकुळे म्हणाले.
विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री होते तेव्हा यापेक्षाही भयंकर घटना घडली होती. त्या ठिकाणी पुन्हा काही होऊ नये म्हणून काही सूचना आणि व्यवस्था उभ्या केल्या. (Nagpur News) सरकारकडून आवाहन करण्यात आलंय की, विरोधकांनी राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Nagpur News : पोहण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेलेल्या डॉक्टरचा जलतरण तलावात बुडून मृत्यू
Pune News : एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी;‘स्वारगेट-मंत्रालय’नवी हिरकणी सेवा सुरू
Pune News : आळंदी मधील ‘त्या’प्रकारापूर्वीचा व्हिडीओ आला समोर; नेमकं काय घडलं?