Municipal Elections | मुंबई : पुण्यासह अनेक बड्या शहरातील महानगरपालिकांच्या निवडणूकांकडे उमेदवारांचे डोळे लागले आहेत. निवडणुका कधी जाहीर होतील, याची आस लागून राहिली आहे. असे असताना उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरापालिकांच्या निवडणुकीचे संकेत दिले आहे. त्यामुळे आजी माजी आणि इच्छुक उमेदवरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
साधारण ऑक्टोबरमध्ये निवडणूक…
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात महापालिका निवडणुका होऊ शकतात, असे मोठे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. महापालिकेच्या निवडणुकी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जुलै महिन्यामध्ये सुनावणी होऊन ऑगस्टमध्ये निकाल येऊन साधारण ऑक्टोबरमध्ये निवडणूक होतील असा अंदाज मी व्यक्त केलेला आहे.
लोकसभेच्या निवडणुका या लोकसभेच्या वेळीच होतील विधानसभेच्या निवडणुका विधानसभेच्या होतील. लोकसभेच्या निवडणुका मोदींचे नेतृत्वाखाली आम्ही प्रचंड मतांनी निवडून येऊ त्यानंतर अधिकच काम करून आम्ही विधानसभेमध्ये निवडणुका जिंकू, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षाच्या ‘घर चलो’ या संपर्क अभियानाचा शुभारंभ आणि भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नामदार फडणवीस बोलत होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!