Mumbai News : मुंबई : ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक करणारी जाहिरात शिवसेनेने राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीवरून अनेक वादंग उठले. भाजप व शिंदे सेना आमनेसामने आले आहेत. याप्रकरणी ती जाहिरात सरकारची नसून, अज्ञात हितचिंतकानं दिली होती, अशी सारवासारव शिंदे सेनेनं केली आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं दैनिक मुखपत्र ‘सामना’तून प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. शिंदेंच्या जाहिरातीसाठी २०-२५ कोटी खर्च करणारा अज्ञात हितचिंतक कोण?, असा प्रश्न सामनातून विचारण्यात आला आहे.
आर्थिक गुन्हे शाखेनं अज्ञात हितचिंतकाचा हा काळा व्यवहार त्वरित शोधून काढावा
एकनाथ शिंदे यांच्या प्रसिद्धीसाठी २५ कोटींची जाहिरात देणारा अज्ञात हितचिंतक कोण आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेला कळायला हवं. त्यानं इतका खर्च का केला?(Mumbai News ) मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अज्ञात हितचिंतकाचा हा काळा व्यवहार त्वरित शोधून काढावा व त्याची खबर गृहमंत्र्यांना द्यावी, अशी मागणी सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
‘डबक्यातला बेडूक हा पावसाळ्यापुरताच असतो. पाऊस गेला, डबकी सुकली की, बेडूकही नष्ट होतील. मग हत्तीची कानदुखी बरी होईल. महाराष्ट्राच्या सत्ताकारणात ‘हत्ती विरुद्ध बेडूक’ अशी विचित्र झुंज सुरू झाली आहे. (Mumbai News ) बेडकांना हत्तीच्या मालकाचाच आशीर्वाद असल्याने हत्ती थोडा चिंतेत आहे, असं सूचक विधानही अग्रलेखात करण्यात आलंय.
शिंदे गटाच्या मंत्र्यांची लाचखोरीची प्रकरणे पुराव्यासह बाहेर पडत आहेत. ही प्रकरणं पुराव्यासह बाहेर कोण देतोय ते सारा महाराष्ट्र जाणतो. कानामागून आलेल्यांना तिखट होऊ देणार नाही हाच त्यामागचा संदेश आहे, अ(Mumbai News ) सं सूचक विधानही करण्यात आलं आहे.
दरम्यान, या जाहिरातीमुळं खवळलेल्या देवेंद्र फडणवीस समर्थकांनी शिंदे गटाला थेट बेडकाची उपमा दिली होती. बेडूक कितीही फुगला तरी त्याचा हत्ती होत नाही असं भाजपचे खासदार अनिल बोंडे म्हणाले. (Mumbai News ) त्यावरून शिंदे गट व भाजपमध्ये हमरी-तुमरी सुरू झाली. फडणवीसांनी कानदुखीचं कारण देत मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबतच्या काही कार्यक्रमांना दांडी मारली. त्यावरही अग्रलेखात भाष्य करण्यात आलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : राज्यातील शाळांमध्ये ज्युनियर, सीनियर केजीचे शिक्षण देणार; शिक्षणमंत्र्यांची घोषणा!
Mumbai News : “त्या” जाहिरातीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रीया; म्हणाले, आमचा प्रवास…