Mumbai News : मुंबई : स्वराज्य व स्वातंत्र्य मिळवण्यासाठीच आपण जन्म घेतलेला आहे आणि तो साध्य करण्यातच आपल्या जीविताचे सार्थक आहे… असे ज्यांना सदैव वाटत असे, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचे जाज्वल्य विचार आणि पराक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून दररोज मंत्रालयात शिवरायाच्या विचारांची आणि पराक्रमाची ध्वनिफीत लागणार आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल शिंदे-फडणवीस सरकारवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सरकारवर अभिनंदनाचा वर्षाव
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. सुमारे ३०० वर्षांहून अधिक काळ लोटला तरी असा एकही दिवस जात नाही की, शिवाजी महाराजांचे नाव घेतले जात नाही. अखिल भारतवर्षात शिवाजी महाराजांच्यासारखे दुसरे व्यक्तिमत्त्व सापडत नाही. महाराजांच्या ठायी कल्पकता, तेजस्विता व स्वाभिमान याशिवाय स्वप्रजावात्सल्य हे अप्रतिम गुण होते. (Mumbai News) राज्यकारभार सुव्यवस्थित चालावा यासाठी त्यांनी अष्टप्रधान मंडळाची कल्पना अंमलात आणली. तसेच त्यांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर स्वराज्यावर आलेल्या अरिष्टांचे निवारण केले. महाराजांच्या या गुणांमुळेच आज त्यांचे चरित्र जगभरात अजरामर झालेले आहे. याच अजरामर असलेल्या महाराजांची यशोगाथा पुन्हा पुन्हा ऐकली जावी, त्यापासून प्रेरणा मिळआवी, यासाठीच हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
मंत्रालयात ऐकवल्या जाणाऱ्या ध्वनिफीतीत २ ते ३ मिनिटांत शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगितली जाणार आहे. तर मंत्रालयात रोज सकाळी १०:४५ वाजता शिवरायांचे विचार ऐकवले जाणार आहेत. कर्मचारी, अधिकारी आणि तिथे आलेल्या अभ्यागतांना विचार ऐकवले जाणार आहेत. (Mumbai News) माझी माती, माझा देश या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : अबब! उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’ बंगल्यात आढळला ४ फूट लांबीचा कोब्रा!
Mumbai News : नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल