Mumbai News : मुंबई : बहुचर्चित राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर जाहीर केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ तसेच वित्त व नियोजन खात्याचा पदभार देण्यात आला आहे. कृषी खाते धनंजय मुंडे यांना तर अन्न व नागरी पुरवठा खाते छगन भुजबळ यांना देण्यात आले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर खाते वाटप जाहीर करण्यात आल्याची चर्चा आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर सुमारे १३ दिवसांनी खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. (Mumbai News) नवनियुक्त मंत्र्यांना खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करण्यात आले आहेत.
मंत्री व त्यांना मिळालेली खाती पुढीलप्रमाणे
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग.
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : गृह विनियोजन विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार
– उपमुखमंत्री अजित पवार : अर्थ आणि नियोजन
* राष्ट्रवादीचे मंत्री
– छगन भुजबळ : अन्न व नागरी पुरवठा
– धनंजय मुंडे : कृषी
– दिलीप वळसे-पाटील : सहकार
– धर्मराव आत्राम : अन्न व औषध प्रशासन
– आदिती तटकरे : महिला व बाल कल्याण
– अनिल पाटील : मदत व पुनवर्सन, आपत्ती व्यवस्थापन
– हसन मुश्रीफ : वैद्यकिय शिक्षण, विशेष सहाय्य
– संजय बनसोडे : क्रिडा व युवक कल्याण, बंदरे
* भाजपचे मंत्री
– मंगलप्रभात लोढा : कौशल्य विकास आणि उद्योजकता,
– राधाकृष्ण विखे पाटील : महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास
– अतुल सावे : गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण
– गिरीश महाजन : ग्रामविकास आणि पंचायती राज, पर्यटन
– विजयकुमार गावित : आदिवासी विकास
– रवींद्र चव्हाण : सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न आणि नागरी पुरवठा
– चंद्रकांत पाटील : उच्च आणि तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
– सुरेश खाडे : कामगार
– सुधीर मुनगंटीवार : वन, सास्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय
* शिंदे गटाचे मंत्री
– उदय सामंत : उद्योग
– दीपक केसरकर : शालेय शिक्षण आणि मराठी भाषा
– शंभूराजे देसाई : राज्य उत्पादन शुल्क
– दादा भुसे : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
– गुलाबराव पाटील : पाणीपुरवठा आणि स्वच्छता
– संदीपान भुमरे : रोहयो योजना, फळोत्पादन
– अब्दुल सत्तार : अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
– तानाजी सावंत : सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
– संजय राठोड : अन्न आणि औषध प्रशासन
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : मुंबई-पुणे शिवनेरीचा प्रवास होणार स्वस्त आणि आरामदायी
Mumbai News : बाईकच्या आरशाला धक्का लागला अन् मोठा अनर्थ घडला; तरुणाची हत्या!