Mumbai News : मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रतिभा पवार यांच्यावर मुंबईमधील ब्रीच क्रँडी रूग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. शरद पवार देखील रूग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, प्रतिभा पवार यांच्यावर नेमकी कोणती शस्त्रक्रिया होणार, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
नेमकी कोणती शस्त्रक्रिया होणार याबाबत स्पष्टता नाही
दरम्यान, अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. शरद पवार यांनी अजित पवारांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. राज्यभरात दौरा करून पक्ष बांधणीवर भर देण्याचा निर्धार पवार यांनी केला आहे. (Mumbai News) राजकीय घडामोडी वाढल्या असतानाच, दुसरीकडे शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांची प्रकृती बिघडली आहे. प्रतिभा पवार यांना मुंबईच्या बीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यावेळी प्रतिभा पाटील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे उपस्थित होत्या. शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी, अजित पवार यांनी प्रतिभा पवार यांच्याकडेही तगादा लावला होता. मात्र, त्यांनी पवार निर्णयावर ठाम असतात, असे मत व्यक्त केले होते. (Mumbai News) अजित पवार यांनी भर सभेत यावर स्पष्टीकरण दिले होते. दरम्यान, आजवर राजकीय कारकिर्दीमध्ये प्रतिभा पवार यांचे मोठे योगदान आहे. शरद पवार यांनी अनेकदा याबाबत खुलासा केला आहे.
शरद पवार कायमच राजकारणात केंद्रस्थानी राहिले आहेत. (Mumbai News) पण, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी मात्र कधीच राजकीय महत्त्वाकांक्षा दाखवली नाही. तसेच राजकीय कार्यक्रमांनाही त्या उपस्थित नसतात. अपवादात्मक स्थितीमध्ये त्या शरद पवार यांच्यासोबत कार्यक्रमांना उपस्थित राहतात.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : मुंबई-पुणे शिवनेरीचा प्रवास होणार स्वस्त आणि आरामदायी