Mumbai News : मुंबई : पुण्यातील सदाशिव पेठेत मंगळवारी सकाळी माथेफिरू तरुणाने तरुणीवर कोयत्याने केलेल्या हल्ल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेमुळे पुणे पोलिसांवर आता टीका होऊ लागली आहे. तसेच राज्य सरकारवर टीकेचे झोड उठून लागली आहे. अशाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता राज्य सरकावर टीका केली आहे.
मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी देखील आज ट्विट करत संताप व्यक्त केला. काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, (Mumbai News) पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात ह्याचं आश्चर्य वाटतं. अर्थात पुढे कशाला चौकशीचा ससेमिरा असा विचार लोकांच्या मनात येत असेलही कदाचित पण ह्यासाठी पोलिसांनी लोकांना आश्वस्त करायला हवं, असं राज ठाकरे म्हणाले.
मनसैनिकांनी अशावेळी धावून जावे; राज ठाकरेंची सूचना
दर्शना पवारच्या हत्येची दुर्दैवी घटना नुकतीच घडलेली असताना, तसाच काहीसा प्रकार परत घडणं हे गंभीर आहे. सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत, त्यामुळे प्रशासनाकडून कायद्याचा धाक निर्माण होईल हे देखील बघायला सरकारची हरकत नसावी, (Mumbai News) असा सल्ला राज ठाकरेंनी यावेली दिला. तसेच माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगायला नको की असे प्रकार तुमच्या आसपास घडत नाहीत ना ह्याकडे डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा, असं आवाहन देखील राज ठाकरेंनी यावेळी केलं.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : चालक आणि कंत्राटदार यांच्या निष्काळजीपणामुळे एका सफाई कर्मचाऱ्याचा हकनाक बळी
Mumbai News : घाटकोपरमध्ये घराचा भाग कोसळला, महानगर पालिकेचे अधिकारी तसेच एनडीआरएफचे जवान घटनास्थळी