Mumbai News : मुंबई : राजकारणात वाद नवीन नाहीत. आता एका वेगळ्याच कारणावरून वादंग उठले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं वाहिल्याने हा राजकीय वाद निर्माण झाला आहे. वंचित आणि शिवसेनेच्या युतीवरून भाजपाने थेट उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला. तसेच प्रकाश आंबेडकरांच्या या कृतीवर ठाकरे गटाची भूमिका काय, असा सवाल भाजपाने उद्धव ठाकरेंना केला.
मला त्याची माहिती घेऊ द्या आणि मग मी त्यावर बोलेन
या वादाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंना याबाबत विचारणा करण्यात आली. (Mumbai News) त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. प्रकाश आंबेडकरांच्या औरंगजेब कबरीला भेट देऊन फुलं वाहण्याच्या कृतीविषयी विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले, “मला आत्ताच माध्यमांकडून ही माहिती कळते आहे. मला त्याची माहिती घेऊ द्या आणि मग मी त्यावर बोलेन.”
या वेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, शिंदे गटाच्या गद्दारीची नोंद जगातील ३३ देशांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांनी ‘जागतिक गद्दार दिन’ साजरा करून, त्यांनी किती निर्लज्जपणे गद्दारी केली होती, (Mumbai News) हे लोकांना दाखवून द्यावं, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी टीकास्र सोडलं. शिंदे गटाने वर्धापन दिन साजरा करण्यापेक्षा ‘जागतिक गद्दार दिन’ साजरा करावा, असा खोचक सल्ला देखील दिला.
दरम्यान, शिवसेनेच्या वर्धापनदिनाची तयारी दोन्ही गटांकडून सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांना विचारले असता, ते म्हणाले, “वर्धापन दिन आम्हीच साजरा करणार आहोत. (Mumbai News) सगळीकडून ‘रिजेक्ट’ झालेला माल आमचा वर्धापन दिन कसा काय साजरा करू शकतो. त्यांनी (शिंदे गट) ‘जागतिक गद्दार दिन’ साजरा करावा. किती निर्लज्जपणे त्यांनी गद्दारी केली, हे त्यांनी लोकांना दाखवून द्यावं.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : स्वस्तात सोने करण्याची सुवर्णसंधी, सोवेरियन गोल्ड बॉन्डची अंतिम मुदत जाहीर
Mumbai News : आता रेशनसाठी रांगा लावायची गरज नाही; राज्य सरकारचा मोठा निर्णय!
Mumbai News : ठाकरे गटाचा आणखी एक शिलेदार शिंदे गटात दाखल; आज पक्षप्रवेश…!