Mumbai News : मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे बंड, मंत्रिमंडळ विस्तारात स्थान यानंतर बंडखोर नेत्यांसह शरद पवारांची भेट…यामुळे राज्याचं राजकारण गेल्या काही दिवसांत ढवळून निघालं आहे. एकीकडे राज्याचे राजकारण तापले असताना दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे विनंती केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या हडपसर ते लोणंद पालखी मार्गासंबंधित त्यांनी थेट ट्विटरच्या माध्यमातून विनंती केली आहे.
हडपसर ते लोणंद पालखी मार्गासंबंधी केली विनंती
बारामती लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या हडपसर ते लोणंद या पालखी महामार्गाचा भाग असणारा हडपसर ते झेंडेवाडी या मार्गाची अद्याप निविदा निघाली नाही. (Mumbai News) दिवे घाटातून जाणारा हा मार्ग वनविभागाच्या हद्दीतून जात असल्याने वन विभागाच्या परवानगीची अडचण होती. परंतु हा विषय देखील मार्गी लागला असून, सुधारित प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे, असे त्यांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे.
सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये उल्लेख केल्यानुसार, नागरीकांच्या सुविधा लक्षात घेता हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. याबाबतच्या सर्व अडचणी दूर झालेल्या असून, हे काम तातडीने सुरु करण्याची नितांत गरज आहे. (Mumbai News) यासंदर्भात माझी रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना विनंती आहे की कृपया या संदर्भात आपण सकारात्मक विचार करुन या मार्गाची निविदा काढण्याचे आदेश द्यावेत, असेही त्यांनी सांगतिले आहे. तसेच नितीन गडकरी यांना टॅग केले आहे.
दरम्यान, शरद पवार यांची अजित पवार गटाच्या ३० आमदारांनी आज पुन्हा एकदा भेट घेतली. या आमदारांनी तासभर शरद पवार यांच्याशी चर्चा केली. (Mumbai News) सलग दुसऱ्या दिवशी अजितदादा गटाने शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. वडिलांबाबत चुकीचं ऐकून घेणार नाही, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला होता. आता राजकारणात नवा अंक पाहायला मिळेल, अशी चर्चा आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : वडिलांच्या डोळ्यांदेखत मुलगा धरणात बुडाला अन् अनर्थ घडला