Mumbai News : मुंबई : घरातील मुलगा मोठा झाला की, घरची जबाबदारी त्याला दिली जाते. शेतकरी देखील शेताची जबाबदारी आपल्या पुढील पिढीकडे देतो. व्यावसायिक देखील हेच करतात… मग राजकारणात आमच्यावर विश्वास का ठेवला जात नाही? महाराष्ट्रात आज जे काही मोजके उत्तम राजकारणी आहेत, त्यात माझाही नंबर कुठेतरी लागतो ना? राज्यकारभार सांभाळायची जबाबदारी आम्ही घेऊ शकत नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित करत, माझ्या दैवताला, माझ्या विठ्ठलाला माझी आजही साष्टांग नमस्कार घालून विनंती आहे, मला आशीर्वाद द्यावा… असे भावनिक आवाहन अजित पवार यांनी केले.
ही वेळ माझ्यावर का आली?
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी वेगळी चूल मांडल्यानंतर आज वांद्रे येथे झालेल्या मेळाव्यात आपले विचार मांडले. ही वेळ माझ्यावर का आली? हा प्रश्न मांडत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. (Mumbai News) मी साहेबांमुळेच घडलो. माझे राजकारण त्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. परंतु देशपातळीवर आणि राज्य पातळीवर जे सुरु आहे, त्याचा विचार केला पाहिजे. आपण विकासासाठी काम केले पाहिजे. यावेळी शरद पवार यांच्या बदललेल्या भूमिकेवर अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला.
परदेशी व्यक्ती पंतप्रधान होऊ शकत नाही, असे १९९९ ला झालेल्या निवडणूकीत यांनीच आम्हाला सांगितले. आम्ही त्यांचे ऐकले. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीचा जन्म झाला. (Mumbai News) मग २०१७ मध्ये आम्हाला सांगितले शिवसेना जातीवादी पक्ष आहे. पुढे काय झाले तुम्ही पाहिलेच असेल. आता शिवसेना जातीवादी राहिली नाही का, दोन वर्षांत भूमिका कशी बदलत गेली? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.
प्रशासनावर माझी पकड आहे की नाही हे महाराष्ट्र जाणतो. मी जातीपातीचं, नात्यागोत्याचं राजकारण केले नाही. मी पहाटे उठून कामाला सुरुवात करतो. महाराष्ट्र पुढे जावं म्हणून हे करत असतो. (Mumbai News) देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य म्हणून मी काम करत असतो. तेव्हा सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडवायचा होता. पण त्यावेळी आपल्याला फक्त ५८ जागा मिळाल्या. काँग्रेसला राज्यात ताकदीचा नेता नसताना ७८ जागा मिळाल्या. विलासराव मुख्यमंत्री झाले. आम्ही सत्तेत गेलो. कामे केली. मला फक्त सात जिल्ह्याचं खातं मिळालं.
मी माझ्या ३०-३५ वर्षांच्या राजकीय जीवनात कुणाचाही अपमान केला नाही. ३० वर्षांच्या जीवनात अनेक गोष्टी सहन केल्या. गुगली टाकली नाही. माझी नियत साफ आहे. तुम्हीच मला सांगा, काय चुकलं माझं? (Mumbai News) आज मी मंत्रिमंडळात आदीवासी, मागासवर्गीय समाजाला, महिलेला, ओबीसी, भटक्या समाजाला प्रतिनीधीत्व दिले. अजूनही अनेक पदे आपल्याला मिळणार आहेत. माझे राजकारण विकासासाठीच आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : दादांनी आजवर किती अपमान सहन केले, पण सावलीलाही…. धनंजय मुंडे भावूक! म्हणाले,
Mumbai News : पवार साहेब, पक्षातील बडव्यांना दूर करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या; छगन भुजबळांची साद!