व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Sunday, May 25, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai News : मोदी-पवार एकाच व्यासपीठावर येणार? मविआमध्ये नाराजीनाट्य; मन वळविण्याचा प्रयत्न….

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 31 July 2023, 14:22

Mumbai News : मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. १) पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच व्यासपीठावर येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, शरद पवार यांनी मोदींसोबत एकाच व्यासपीठावर बसू नये, असे मत महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे आहे. पवार यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटातून नाराजीचे सूर उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर आज ज्येष्ठ पुरोगामी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे.

पवार यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटातून नाराजीचे सूर

विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी पुरस्कार स्वीकारावा, यासाठी रोहित टिळक यांनी शरद पवार यांनाच मोदींना विनंती करायला सांगितली होती. (Mumbai News) त्यामुळे पवार पुण्यातील ज्येष्ठ मंडळींची विनंती लक्षात घेता मंगळवारी या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार की मोदींसाठी कार्यक्रमाला जाणार? हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शरद पवार यांनी या कार्यक्रमाला जाणं टाळावं, असं आवाहन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. त्यानंतर आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, गांधीवादी विचारवंत कुमार सप्तर्षी यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. “शरद पवारांनी पंतप्रधान मोदींसोबत एकाच मंचावर उपस्थित राहू नये. (Mumbai News) तुम्ही जर उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात तर देशात वेगळा संदेश जाईल,” असं कुमार सप्तर्षी यांनी शरद पवार यांना सांगितलं आहे.

यावर शरद पवार यांनी हा कार्यक्रम टाळता येणार नाही, असे उत्तर दिल्याची माहिती मिळत आहे. कारण हा पुरस्कार स्विकारावा, अशी विनंती शरद पवार यांनीच मोदी यांना केली होती, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, शरद पवारांच्या या भूमिकेबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

दरम्यान, मंगळवारी होणाऱ्या कार्यक्रमाला शरद पवार यांच्या उपस्थितीला काँग्रेस, राष्ट्रवादी (पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. एकीकडे मोदींना पुरस्कार दिला जात असताना, त्याचवेळी मंडईमध्ये ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांच्या नेतृत्वात विविध संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी आंदोलन करतील. (Mumbai News) तत्पूर्वी पुण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप तसेत ठाकरे गटाचे नेते पवारांची भेट घेऊन आपण या कार्यक्रमाला जाऊ नये, अशी विनंती करणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती असेल. पुणे दौऱ्यात पंतप्रधान मोदी पुणे मेट्रोच्या नव्या टप्प्यासह विविध योजनांचे उद्घाटन करणार आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Mumbai News : मोठी अपडेट! जयपूर-मुंबई ट्रेन गोळीबार प्रकरण; अस्वस्थ मानसिकतेतून आरोपी चेतनने केला गोळीबार!

Mumbai News : जयपूर-मुंबई पॅसेंजर एक्स्प्रेस गोळीबार; आरोपी चेतन सिंह जीआरपीच्या ताब्यात

Mumbai News : अजिंक्य रहाणेचा चाहत्यांना मोठा झटका ; ‘या’ संघाकडून खेळण्यास नकार!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

खराडीतील बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड, अमेरिकन नागरिकांना डिजीटल अरेस्टची भिती दाखवून घालत होते लाखोंचा गंडा

Sunday, 25 May 2025, 12:02

न्हावरे येथून ऊसतोड कामगाराने लाखोंचा ऐवज लांबविला…..

Sunday, 25 May 2025, 12:02

पुण्यात गोळीबाराचा थरार ; गप्पा मारत बसलेल्या तरुणांवर झाडल्या धडाधड गोळ्या

Sunday, 25 May 2025, 11:34

पिंपरी चिंचवड महापालिकेचा पूर्ण कामकाज आता ‘डिजिटली’

Sunday, 25 May 2025, 11:14

संतापजनक! जन्मदात्या पित्याकडून पोटच्या मुलीची गळा दाबून हत्या ; सोलापूरमधील घटना

Sunday, 25 May 2025, 11:06

वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांकडून शोध सुरू

Sunday, 25 May 2025, 10:47
Next Post

Pune News : कामाच्या बहाण्याने निर्जन ठिकाणी नेवून महिलांना लुटणाऱ्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.