Mumbai News : मुंबई : पक्षाला माझी गरजच उरलेली नाही, हे गेल्या काही महिन्यांपासून मला जाणवत होतं. महिला आघाडीची कुचंबना होत असतानाही कोणी बोलत नव्हतं. मला मनमोकळेपणानं बोलू द्या, काम करण्याची संधी द्या, हे मी अनेकांना सांगितलं. मात्र, पक्षाच्या निर्णयामध्ये आम्हाला कुठेच स्थान नव्हते. अखेर माझा नाईलाज झाला आणि मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रीया शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मनिषा कायंदे यांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांना दिली. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले.
पक्षाच्या निर्णयामध्ये कुठेच स्थान नव्हते
दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी रविवारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले. कायंदे म्हणाल्या की, संघटनात्मक काम करण्याचा माझा पिंड आहे. (Mumbai News) पक्षानं मला मानसन्मान दिला. मी पक्षाची भूमिका मांडली. आता पक्षाची विचारधार भरकटत आहे. माझी अजून एक वर्ष टर्म आहे. संघटनेत चांगलं पद द्या एवढीच माझी मागणी होती. पण मला छत्रपती संभाजीनगरमध्ये जबाबदारी दिली आणि त्यानंतर एक ज्युनियर माझ्या डोक्यावर बसवला. मला मनमोकळेपणानं बोलू द्या, काम करण्याची संधी द्या, हे मी अनेकांना सांगितलं. मात्र पक्षाच्या निर्णयामध्ये आम्हाला कुठेच स्थान नव्हते, असे कायंदे यांनी सांगितले.
या वेळी बोलताना त्या म्हणाल्या की आताही मी शिवसेनेत आहे. फक्त नेतृत्वात बदल झाला. मी अधिकृत शिवसेनेत आले. सगळ्यात आधी मी जे मतदान केलं होतं ते धनुष्यबाणालाच केलं होतं. (Mumbai News) २०१९ च्या निवडणुका युतीमध्ये लढलो. त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना झाली. जुन्या जाणत्या शिवसैनिकांना महाविकास आघाडी अजिबात आवडली नव्हती. आम्ही उद्धव ठाकरे यांना भक्कम साथ दिली, असं कायंदे यांनी म्हटलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : ठाकरे गटाच्या आणखी एका साथीदाराचा पक्षाला जय महाराष्ट्र!