Mumbai News : मुंबई : ‘महाराष्ट्र ना कभी झुका है, ना कभी झुकेगा…’, ‘मोडेन पण वाकणार नाही’ जे गद्दार असतील त्यांना गद्दार म्हणायची ताकद माझ्यात आहे, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना उद्देशून म्हणलं आहे. महाविकास आघाडीकडून राज्यभरात अनेक ठिकाणी गद्दार दिन साजरा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे देखील यात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.
या राज्यात लोकशाही राहिली आहे का?
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘या राज्यात लोकशाही राहिली आहे का? असा सवाल करतानाच रस्त्यावर आंदोलन करायला परवानगी मिळत नसेल तर कितीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही दडपशाहीच्या विरोधात लढत राहणार.(Mumbai News) आम्ही गद्दार दिवस साजरा करत आहोत आणि या कारणासाठी आम्हाला जेलमध्ये टाकणार असाल तर आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत. गद्दारांना गद्दार म्हटल्यामुळे आम्हाला तुरुंगात टाकणार असाल, तुमच्यात हिंमत असेल तर आम्हाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात टाका. मग आम्ही जेलभरो आंदोलन करू.’एक वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे व इतर काही आमदारांनी केलेल्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या बंडामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गद्दार दिवस साजरा करण्यात येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : धक्कादायक! 30 वर्षीय महिलेची प्रियकराकडून ऑटोरिक्षामध्ये हत्या