Mumbai News : मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घटना-घडामोडी घडत आहेत. यातच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा दावा केला आहे. या दाव्यामुळे राजकारणात खळबळ माजली आहे. बावनकुळे यांच्या दाव्यानुसार, महाराष्ट्रात सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री करण्याची महाविकास आघाडीची योजना आहे. याबाबत करार देखील झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात या दाव्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या एका मेळाव्यात बोलत होते. या वेळी बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता सध्या गोंधळलेल्या मानसिकतेत आहे. (Mumbai News) शिंदे गटातील आमदारांवर ५० खोके घेतल्याचे आरोप केले जात आहेत. मात्र, हे आरोप धादांत खोटे आहेत. मी २० वर्षांपासून विधीमंडळात काम करत आहे. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये मला शिवसेनेचे आमदार किमान ५० वेळा भेटले असतील. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी कायम राहिले तर आम्ही ६५ चे १० झाल्याशिवाय राहणार नाही. कारण शिवसेना संपवण्याचा विडा राष्ट्रवादी काँग्रेसने उचलला आहे.
खोके वगैरे घेतले नाहीत, हा ‘नरेटिव्ह’ तयार करण्यात आला आहे
बावनकुळे म्हणाले की, यापूर्वी उद्धव ठाकरे आणि अजित पवार असा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदासाठी करार होता. आता पुढचा करार सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे असा असेल. (Mumbai News) या कराराच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी आपले सर्व आमदार गमावण्याचा निर्णय घेतला. याची शिंदे गटातील आमदारांना भीती वाटली, म्हणून त्यांनी सत्ता सोडली. त्यांनी खोके वगैरे घेतले नाहीत, हा ‘नरेटिव्ह’ तयार करण्यात आला आहे, असंही बावनकुळे म्हणाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : आशिष देशमुख यांचा भाजपात प्रवेश; विदर्भाच्या हितासाठी काम करणार!
Mumbai News : स्वस्तात सोने करण्याची सुवर्णसंधी, सोवेरियन गोल्ड बॉन्डची अंतिम मुदत जाहीर