Mumbai News : मुंबई : राष्ट्रवादीतून बंड करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काहीच दिवसांत अजित पवार यांनी अर्थमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. तिजोरीच्या चाव्या हाती आल्यानंतर अजित पवार यांनी आपल्या आमदारांवर निधीचा वर्षाव केला. पाठिंबा देणाऱ्या आमदारांवरही निधीची खैरात केल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात अजित पवार अर्थमंत्री होते. त्यावेळी पुरेसा निधी मिळत नसल्याच्या कारणाने शिंदे नाराज होते. अर्थमंत्रीपद अजित पवार यांना मिळू नये, अशी भूमिका शिंदे गटाने घेतली होती. या पार्श्वभूमीवर ही नाराजी दूर करण्यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनाही निधीची तरतूद केली आहे. शिंदे गटाच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या आमदारांना सर्वाधिक निधी देण्यात आल्याचं समजतंय. यानिमित्ताने अजित पवार यांनी भविष्यातील निधी वाटपाचे संकेतच दिल्याची चर्चा होत आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघासाठी अद्याप निधी मंजूर नाही
अर्थमंत्रीपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर पुरवणी मागण्यांमध्ये लोकप्रतिनिधींच्या विकास कामांसाठी १ हजार ५०० कोटींच्या निधीची तरतूद अजित पवार यांनी केली आहे. (Mumbai News) आमदारांसाठी २५ ते ५० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर, राष्ट्रवादीच्या आमदारांना प्रत्येकी २५ कोटींचा निधी देण्यात आला आहे. काही आमदारांना तर ४० कोटींचा निधीही दिल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, देवळाली मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी प्रथम शरद पवार यांना पाठिंबा दिला होता. नंतर अजित पवार यांना पाठिंबा दिला. त्यामुळे सरोज अहिरे यांच्या मतदारसंघासाठीही ४० कोटींचा निधी देण्यात आला आहे. जयंत पाटील यांच्या मतदारसंघासाठी अजित पवार यांनी भरभरून निधी दिला आहे. (Mumbai News) त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघासाठी अद्याप निधी मंजूर केलेला नाही.
यापूर्वी अजित पवार यांच्यापासून शिवसेनेला वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली होती. सासूमुळे वाटणी झाली आणि सासूच वाट्याला आली अशी शिंदे गटाची स्थिती असल्याचे बोलले जाते होते. (Mumbai News) आता ही नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार यांनी शिंदे गटाच्या आमदारांना देखील निधीचे वाटप केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : .. अजित दादांनी उद्धव ठाकरेंसाठी खुर्ची केली पुढे; दोघांच्या गाठीभेटीने चर्चांना उधाण!
Mumbai News : भाजपमध्ये पुन्हा मोठे फेरबदल; जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर
Mumbai News : धक्कादायक! राज्यातील तब्बल १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे आधार अवैध!