Mumbai News : मुंबई : राज्यात उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? यासंदर्भात एक सर्वेक्षण झाले. या सर्वेक्षणाची जाहिरात शिवसेनेकडून वृत्तपत्रांमध्ये करण्यात आली आहे. राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे, असे या जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. या जाहिरातीत केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो वापरले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये किती टक्के उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून पसंती हे देखील नमूद करण्यात आलं आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना शिंदेंपेक्षा कमी टक्केवारीची पसंती दाखवण्यात आली आहे. शिवसेनेच्या या जाहिरातीमुळे भाजपमध्ये नाराजी पसरल्याचं वृत्त समोर आलं आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली आहे. (Excellent Chief Minister Eknath Shinde? Displeasure in BJP due to Shiv Sena’s advertisement! Finally, the Chief Minister said, …)
हे डबल इंजिनचं सरकार आहे; देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन आम्ही काम करत आहोत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी नम्रपणे सांगू इच्छितो की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सरकार काम करत आहे. हे डबल इंजिनचं सरकार आहे. केंद्र सरकारकडूनदेखील महाराष्ट्राच्या विकासकामांना मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. आर्थिक पाठबळ दिलं जातं. (Mumbai News) म्हणूनच महाविकास आघाडी सरकारच्या काळात मेट्रोसारखे प्रकल्प, पायाभूत सुविधांसारखे प्रकल्प बंद होते. ते प्रकल्प आमच्या सरकारने सुरु केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन आम्ही काम करत आहोत. आम्ही शेतकऱ्यांच्या शेतावर जातो, प्रकल्पाची पाहणी करायला प्रकल्पाच्या ठिकाणी जातो, असंही शिंदे म्हणाले.
आमच्या युतीचे सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या राज्यातल्या जनतेने एका सर्व्हेच्या माध्यमातून मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या कामामध्ये पसंती दिली आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. या सर्व्हेनंतर आमची जबाबदारी वाढली आहे. आम्ही आणखी जोमात काम करु. आमच्या कामांचा वेग आणखी वाढेल. सर्वसामान्यांना या कामाचा नक्कीच लाभ होईल, असा दावा शिंदे यांनी केला.(Mumbai News) आम्ही पाठवलेले प्रस्ताव, जसेच्या तसे मंजूर केले जातात. त्यामुळेच आम्ही विकासाचे प्रकल्प जोमाने पुढे नेत आहेत. जनता त्यासाठी आमचे मनापासून अभिनंदन करत आहे. या जाहिरातत कोणाचा फोटो आहे, कोणाचा नाही, हे फारसे महत्त्वाचे नाही. आम्ही दोघेही लोकांच्या मनात आहोत, हे सर्वांत महत्त्वाचं आहे. यासाठीच मी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मनापासून धन्यवाद देईन.
आमची युती स्वार्थासाठी झालेली नाही. ही वैचारिक युती आहे. ही युती येणाऱ्या विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सर्व निवडणुका लढेल आणि पूर्ण ताकदीने सर्व निवडणुका जिंकेल, असा दावा देखील एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : शेतकऱ्यांसाठी खुशखबर… मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय!