Mumbai News : मुंबई : सोमय्या यांच्या कथित अश्लील व्हायरल व्हिडीओवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची जोरदार मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. तर किरीट सोमय्यांच्या मागणीप्रमाणे तुम्ही त्यांची चौकशी ईडी, सीबीआयकडे देणार का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी विचारला आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया देत, सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल आणि वरिष्ठ स्तरावरील चौकशी करणार असल्याची घोषणा केली आहे.
सखोल आणि वरिष्ठ स्तरावरील चौकशी करणार
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकारणात अनेकवेळा असे प्रसंग येतात की त्यात माणसाचं पूर्ण राजकीय आयुष्य आणि केलेली पुण्याई पणाला लागते. पण, समोर आलेल्या प्रकरणात काही तक्रारी असतील तर त्याची चौकशी आम्ही करू. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. (Mumbai News) कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही.
कोणतेही प्रकरण दाबले किंवा लपवले जाणार नाही. तपासासाठी पोलिसांना महिलेची ओळख दिली जाईल. पोलीस कायद्याच्या चौकटीत राहून महिलेची ओळख पटवतील, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (Mumbai News) दरम्यान, सोमय्यांनी पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. याची अतिशय सखोल आणि वरिष्ठ स्तरावरील चौकशी करण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : तुम्ही सोमय्यांची ईडी, सीबीआय चौकशी करणार का? भास्कर जाधवांचा रोख कोणाकडे?
Mumbai News : माझ्याकडे सोमय्यांचे अनेक व्हिडीओ; पेन ड्राइव्ह घेऊनच सभागृहात जातोय; दानवेंचा इशारा!