Mumbai News : मुंबई : अजित दादांवर आतापर्यंत बरीच टीका झाली. त्यांनी किती अपमान सहन केले, पण ते त्यांच्या सावलीलाही कळू दिले नाही. प्रत्येक वेळेस त्यांच्यावर टीका झाली. पण त्यांनी साहेबांसाठी सगळं सहन केलं. आज या व्यासपीठावर बोलताना माझ्या डोळ्यांत पाणी दिसत नसेल, पण माझं मनं रडतंय की अजित दादांना किती वेदना सहन कराव्या लागल्या असतील, असे म्हणत व्यासपीठावर बोलताना धनंजय मुंडे भावूक झाले.
कधी तरी महाराष्ट्राच्या जनतेला सांगावे लागेल
अजित पवार यांनी मुंबईतील वांद्रे भागातील एमईटी मैदानावर बैठक बोलावली आहे. यात बोलताना धनंजय मुंडे गहिवरले. आतापर्यंत सगळ्यात जास्त अपमान अजित पवार यांचा झाला, असं धनंजय मुंडे म्हणाले. (Mumbai News ) स्वाभिमानाचा पक्ष म्हणून आपण राष्ट्रवादी पक्ष समजतो. हा स्वाभिमान माझ्यासारखा आहे. घरातून आणि पक्षातून बाहेर काढलेल्या माणसाला आज तुमच्यासमोर बोलायचे. या ठिकाणी ताकद जर कोणी दिली असेल तर ती फक्त अजित दादा पवार साहेबांनी दिली. तुम्ही तुमच्या सावलीला सुद्धा तुमचा अपमान सांगितला नाही. कधी तरी महाराष्ट्राच्या जनतेला सांगावे लागेल. मला एक विश्वास आहे, तुमची नियत सुद्धा साफ आहे.
धनंजय मुंडे म्हणाले की, अजितदादांनी एवढी वर्षे पक्षाची आणि साहेबांची सेवा केली. साहेबांकडे विठ्ठलासारखं पाहिलं. पण आज हा निर्णय घेताना किती वेदना झाल्या असतील मला माहीत आहे. (Mumbai News ) ज्यांनी पक्षाच्या सेवेत हयात घालवली, त्यांना हा निर्णय घेताना असह्य वेदना झाल्या असतील. दादा, तुमच्या सगळ्यांच्या योगदानामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढला. आपण अनेकांना संधी दिली आहे. आजही या बहुसंख्य लोकांची सावली म्हणून तुम्ही तुमचे आयुष्य वेचले. नियती तुमच्या पाठीमागे उभी राहिल्याशिवाय राहणार नाही, हा माझा विश्वास आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी आठ वर्षे सत्ता नसताना अतिशय वाईट प्रसंगात पीए म्हणून साहेबांकडे काम केलं. अनेक कठीण प्रसंगात ज्यावेळेस २०१४ नंतर वाईट परिस्थिती पक्षावर आली. (Mumbai News ) साहेबांनी जबाबदारी घेतली. पुन्हा पक्ष जिवंत करण्यासाठी कार्यकर्त्यांची संख्या वाढली. दादांच्या जीवनात कितीही प्रसंग आले असतील, तरी आयुष्यात संधी देताना कितीही चांगली संधी असली तरी कार्यकर्त्यांना दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : पवार साहेब, पक्षातील बडव्यांना दूर करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या; छगन भुजबळांची साद!
Mumbai News : शरद पवारांचा अजित पवारांना सज्जड इशारा; म्हणाले, जिवंतपणी माझा फोटो…!