Mumbai News : मुंबई : महाराष्ट्रात आज मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या ४० सहकारी आमदारांसोबत भाजप आणि शिवसेनेशी हात मिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणातला हा दुसरा राजकीय भूकंप आहे. दरम्यान, या शपथविधीला आमचा पाठिंबा नसल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले, “आज अजित पवार आणि त्यांच्या काही सहकारी आमदारांनी आपल्या शिवसेना-भाजपा युतीच्या सरकारला पाठिंबा दिला आहे. (Mumbai News) नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील जे डबल इंजिनचं सरकार आहे, त्याला आता ट्रिपल इंजिन जोडलं आहे. आता राज्याचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे धावेल. याचा महाराष्ट्राच्या जनतेला फायदा होईल आणि राज्याचा विकास अतिशय वेगाने होईल, एवढंच मी याप्रसंगी सांगतो.”
अजित पवारांनी समर्थक आमदारांच्या उपस्थितीत राजभवनावर जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गट-भाजपा सरकारचे अनेक आमदार उपस्थित होते. (Mumbai News) अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही; शरद पवार यांची प्रतिक्रिया
दरम्यान, आज अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अनिल भाईदास पाटील, बाबुराव अत्राम, संजय बनसोडे यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, शरद पवार यांनी या शपथविधीला पाठिंबा नसल्याचे सांगितले. (Mumbai News) मी अजूनही खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा मला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू. होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही, असे ट्विट शरद पवार यांनी केले.
काय म्हणाले राज ठाकरे?
मनसे प्रमुख राज ठकरे यांनीही आपली प्रतिक्रीया दिली आहे. उद्धव ठाकरे यांचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. (Mumbai News) शरद पवारांची पहिली टिम रवाना झाली आहे. लवकरच दुसरीही टिम त्या दिशेने जाईल, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
Mumbai News : खूशखबर! जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ… कोणाला दिलासा?