Mumbai News : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यापाठोपाठ शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना देखील फोनवरून धमकी देण्यात आली. त्यानंतर संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनाही फोनवरून धमकावल्याची माहिती राऊत यांनी दिली. याप्रकरणी एक कॉल रेकॉर्डिंग समोर आलं होतं. या प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. पोलिसांनी मयूर शिंदे नावाच्या एका तरुणाला अटक केली आहे. शिंदे हा संजय राऊतांचा निकटवर्तीय असून, राऊतांच्या सांगण्यावरून त्याने हे धमकीचे नाटक केल्याचा दावा मनसे आणि भारतीय जनता पार्टीने केला आहे.
संजय राऊत यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ व्हावी यासाठी बनाव?
मयूर शिंदे हा सुनील राऊत यांचा निकटवर्तीय असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. शिंदे याचे सुनील राऊत यांच्यासोबतचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. (Mumbai News) संजय राऊत यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ व्हावी, यासाठी सुनील राऊत यांनी हा बनाव केल्याची प्राथमिक माहिती आहे. राऊत बंधुंना धमकी दिल्यानंतर चार जणांना ताब्यात घेण्यात आले. यात मयूर शिंदे यांचे नाव समोर आले आहे.
दरम्यान, राऊत यांच्यावरील धमकी बनाव प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार हल्लाबोल केला आहे. मनसेचे नेते, सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टि्वट करीत राऊत धमकी प्रकरणात मुंबई पोलिसांना आवाहन केले आहे. मयूर शिंदे याने कोणाच्या सांगण्यावरून धमकी दिली, हे जनतेला समजलेच पाहिजे. मुंबई पोलिसांनी हे जाहीर करावे, असे संदीप देशपांडे यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
गुरुवारी सायंकाळी संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आली. सुनील राऊत यांच्या फोनवरुन ही धमकी देण्यात आली. फोन करणारी व्यक्ती हिंदीतून बोलत होती. या धमकीनंतर संजय राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. सरकारने ही धमकी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. (Mumbai News) ठाण्यातील एका गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीची माझ्यावर हल्ल्याची योजना आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. या वेळी संजय राऊत आणि सुनील राऊतांना आलेल्या धमकीची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली. राज्यातील कोणत्याही पक्षाचा नेता असुरक्षित असणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारनं दिली आहे.
याप्रकरणी मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, संजय राऊत हा एक नंबरचा बोगस माणूस आहे हे या प्रकरणातून सिद्ध झालं आहे. किती खोटं बोलायचं एखाद्या माणसाने, आपण किती खोटारडे आहोत हे राऊत यांनी सिद्ध केलं आहे. केवळ पोलीस संरक्षण मिळावं, आपला लवाजमा वाढावा यासाठी किती नाटकं करावीत याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे संजय राऊत. म्हणजे तुम्ही (राऊत) तुमच्याच माणसाला सांगताय की, मला धमकीचे फोन कर. तो माणूस फोन करून शिव्या घालण्याचं नाटक करतोय. (Mumbai News) त्याला सुनील राऊत शिव्या घालून उत्तर देत आहेत. किती ती नाटकं. या संजय राऊतांनी राजकारण सोडून नाटकात कामं केली तर मोठं नाव कमावतील. रोज सकाळी ते जो हंगामा करत आहेत ते बंद होईल. मुळात यांचे गँगस्टर (माफिया/डॉन) लोकांशी कशा पद्धतीचे संबंध आहेत ते यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
देशपांडे म्हणाले, हा मयुर शिंदे शिवसेनेचाच कार्यकर्ता आहे. तो एक गँगस्टर आहे. त्याचे संजय आणि सुनील राऊतांबरोबरचे अनेक फोटो आहेत. हा कोण आहे हे सांगायची गरज नाही, कारण हे सगळं दिसतंच आहे. (Mumbai News) आता न घाबरता आणि न थुकंता यावर संजय राऊतांनी उत्तर दिलं पाहिजे. नाहीतर लोक आता त्यांच्यावर थुंकतील. या सगळ्या प्रकरणामुळे महाराष्ट्राला तोंड कसं दाखवायचं, रोज सकाळी तोंड दाखवायचं का, असा प्रश्न त्यांना पडला असेल.
आता या प्रकरणावर संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात, याकडे माध्यमांचे लक्ष लागले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : शिवसेना आमदार संजय गायकवाडांकडून औकातीची भाषा; चंद्रशेखर बावनकुळेंचा शिवसेनेला सल्ला!