Mumbai News : मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटत आहेत. दरम्यान, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता भाजपमध्ये देखील अनेक बदल होत आहेत. जबाबदाऱ्या वाटून दिल्या जात आहेत. आगामी निवडणुकीत बहुमताने निवडून येण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.
तरुण चेहऱ्यांना संधी!
भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करण्यात आली आहे. अॅड. हर्षल प्रमोद पाटील यांची भाजपा भिवंडी शहर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. (Mumbai News) अनेक नव्या आणि तरुणांना महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून जिल्हाध्यक्षपदी तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करत आहे. (Mumbai News) राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून ७० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. मला खात्री आहे, माझे नवनियुक्त सहकारी पक्षासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावतील. या सर्वच सहकाऱ्यांच्या सोबतीने २०२४ च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज होत आहोत.
या वेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भाजपा नव्या भारताच्या उभारणीसाठी कटिबद्ध आहे. पक्षाच्या बांधणीत कार्यकर्त्यांचे योगदान सर्वोच्च आहे. (Mumbai News) पक्षासाठी कार्यकर्ते सर्वस्व असून, त्यांच्या अविश्रांत कष्टामुळे पक्षाने आज नवी उंची गाठली आहे. नवनियुक्त सर्व जिल्हाध्यक्षांनी सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करायचा आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : धक्कादायक! राज्यातील तब्बल १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे आधार अवैध!
Mumbai News : तुम्ही सोमय्यांची ईडी, सीबीआय चौकशी करणार का? भास्कर जाधवांचा रोख कोणाकडे?