Mumbai News : मुंबई : राजकारणात पक्षबदल नवीन नाही. आता काँग्रेस, भाजपा आणि पुन्हा काँग्रेस असा प्रवास केलेल्या आशिष देशमुख यांनी आता पुन्हा भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
मी पदाची मागणी केली नाही
दरम्यान, काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आल्यापासून त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. अखेर आज (ता. १८) त्यांनी भाजपात प्रवेश केला. देशमुख यांनी यापूर्वी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. यावेळी ते म्हणाले की, “मी कुठल्याही पदाची मागणी केली नाही. (Mumbai News ) मी कार्यकर्ता म्हणून आणि पक्ष जी जबाबदारी देईल ते काम करत राहणार आहे. माझी राजकीय वाटचाल कोण्या एका मतदारसंघासाठी केलेली नाही. विदर्भाच्या हितासाठी मी काम करणार आहे. श्रद्धा आणि सबुरीने माझी पुढील राजकीय वाटचाल राहील.”
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे आशिष देशमुख हे पुत्र. राजकीय धडे त्यांनी काँग्रेसमध्ये गिरविले. मग त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपात असताना आमदार म्हणून निवडून आले. (Mumbai News ) मात्र, भाजपात त्यांचं पटलं नाही म्हणून आमदारकीचा राजीनामा दिला. भाजपा सोडल्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला, पण तेथेही अन्य कोणाशी फारसे पटले नाही. आता पुन्हा त्यांनी भाजपाचा मार्ग पत्करला आहे.
नितीन गडकरी प्रदेशाध्यक्ष असताना २००९ मध्ये माझा प्रवेश भाजपामध्ये झाला होता. (Mumbai News ) नितीन गडकरी माझ्यासाठी पितृतुल्य आहेत. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो होतो. पश्चिम नागपूरमधून मला उमेदवारी देऊ केली होती, असेही देशमुख यांनी सांगितले.
आशिष देशमुख यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधातील वक्तव्य केले होते. यामुळे त्यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झाली होती. शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत आदेश दिले होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : स्वस्तात सोने करण्याची सुवर्णसंधी, सोवेरियन गोल्ड बॉन्डची अंतिम मुदत जाहीर
Mumbai News : आता रेशनसाठी रांगा लावायची गरज नाही; राज्य सरकारचा मोठा निर्णय!