Mumbai News : मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेचे दोन गटांत विभाजन झाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का होता. त्यानंतर ठाकरे गटाला अनेक धक्के बसले. आता ठाकरे गटाचं राज्यव्यापी शिबीर मुंबईमध्ये पार पडणार आहे. या शिबीराला सुरुवात होण्यापूर्वीच ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या विधान परिषद आमदार मनिषा कायंदे या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. कायंदे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
मनिषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार
ठाकरे गटाचं राज्यव्यापी शिबीर वरळीमध्ये सुरु झालं आहे. शिबीरापूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांचा फोन नॉट रिचेबल लागला. यामुळे चर्चेला उधाण आले. समोर आलेल्या माहितीनुसार कायंदे या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. (Mumbai News) आज पाच वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन त्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
दरम्यान, आज शिवसेना ठाकरे गटाचं शिबीर वरळीमध्ये पार पडत आहे. या शिबीरामध्ये बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘वाघ निघाले गोरेगावला’ असं मिंधे गटाचं बॅनर लागलं आहेत; पण खरे वाघ इथे आहेत, त्यांनी तर वाघाचं कातड पांघरलं आहे, (Mumbai News) असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, शिंदे गटाला स्वत:चे अस्तित्व नाही. निवडणूक घेण्याची हिंमत देखील त्यांच्यामध्ये नाही. हिंमत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा, (Mumbai News) असे आवाहन राऊत यांनी केले. दरम्यान, आज आणि उद्या शिवसेनेची पुढची दिशा ठरेल. उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे अध्यक्ष राहातील, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : राज्यातील शाळांमध्ये ज्युनियर, सीनियर केजीचे शिक्षण देणार; शिक्षणमंत्र्यांची घोषणा!