मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पुन्हा १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत. यामुळे राऊतांना १९ सप्टेंबरपर्यंत कारागृहात मुक्काम करावा लागणार आहे.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत यांना ईडीने ३१ जुलै रोजी अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना ८ दिवस ईडीने कोठडीत घेतले होते. ईडीच्या कोठडीनंतर त्यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर ईडीने राऊत यांना न्यायालयात हजर केले होते. आणि कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
आज सोमवारी (ता.५) न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर ईडीने राऊत यांना न्यायालयात हजर केले होते. आणि त्यांचा कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने राऊत यांना पुन्हा १४ दिवसन्यायालयीन कोठडीचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे राऊत यांना १९ सप्टेंबरपर्यंत कारागृहात मुक्काम करावा लागणार आहे.
दरम्यान, खासदार संजय राऊतांची रवानगी आर्थर रोडवरील कारागृहात करण्यात आली होती. आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांना घरचे जेवण आणि औषध्ये पुरवण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे.