पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवार (ता. २३) पुण्यात दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाऊन खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गिरीश बापट मंगेशकर रुग्णालयात दाखल आहेत. फडणवीस यांच्यासह पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, प्रविण दरेकर यांनी बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या अंत्यदर्शनासाठी आज फडणवीस आणि सहकारी पुण्यात आले आहेत. दरम्यान बापट यांची प्रकृती देखील ठीक नसल्याने फडणवीस आणि सहकाऱ्यांनी बापटांची भेट घेत, डॉक्टरांशी सल्लामसलत केली.
गेल्या काही दिवसांपासून खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खालावली आहे, त्यामुळे त्यांना पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या पार्श्वभूमीवर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाऊन खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली.