Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतकऱ्याच्या आंदोलनाची धग वाढू नये, म्हणून  मोदी सरकारचा मोठा निर्णय; एमएसपी पारदर्शकतेसाठी समितीची स्थापना

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 23 August 2022, 16:31
दिल्ली : शेतकरी आंदोलन सुरु होऊ नये, म्हणून मोदी सरकारने सावध पावले उचलण्यास सुरवात झाली आहे. आश्वासन देऊनही  मोदी सरकारने अनेक मागण्या पूर्ण केल्या नाहीत, म्हणून दिल्लीत पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनास सुरुवात झाली आहे. या आंदोलनाची धग वाढू नये, म्हणून मोदी सरकारने स्थापन केलेली समिती सक्रिय झाली आहे. काल (सोमवारी) शेतकरी आंदोलनादरम्यान केंद्राने किमान आधारभूत किंमतीबाबत (एमएसपी) स्थापन केलेल्या समितीची पहिली बैठक दिल्लीत पार पाडली.
यामध्ये एमएसपी अधिक प्रभावी आणि पारदर्शक बनविण्यासह मुद्द्यांवर लक्ष ठेवण्यासाठी चार उपगटांची स्थापना करण्यात आली. या चारही गटांची स्वतंत्र बैठक होणार असून समितीची शेवटची बैठक सप्टेंबरच्या अखेरीस होणार आहे.
समितीमध्ये अध्यक्षांसह 26 सदस्य आहेत, तर एसकेएमच्या प्रतिनिधींसाठी तीन जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.समिती सदस्य विनोद आनंद यांनी सांगितले की, तीन विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
समितीच्या शिफारशींच्या आधारे केंद्र सरकार भविष्यात एमएसपी आणि इतर विषयांवर धोरणात्मक निर्णय घेईल. युनायटेड किसान मोर्चाने यापूर्वी यात सहभागी होण्यास नकार दिला होता. एमएसपी हमी कायदा आणावा, अशी त्यांची मागणी होती. यामुळे समितीच्या बैठकीला त्यांचा एकही नेता उपस्थित नव्हता.
‘ही’ कामे करणार समिती 
1. शेतकरी गट सीएनआरआयचे सरचिटणीस आनंद म्हणाले की, पहिला गट हिमालयीन राज्यांसह पीक पद्धती आणि पीक वैविध्य यांचा अभ्यास करेल आणि त्या राज्यांमध्ये एमएसपी समर्थन कसे सुनिश्चित करता येईल यावर विचार करेल.
2. कृषी संशोधन परिषदेच्या अध्यक्षतेखालील कोरडवाहू शेतीसाठी केंद्रीय संशोधन संस्था, हैदराबाद, नागपूरस्थित नॅशनल ब्यूरो ऑफ सॉयल सर्व्हे अँड लँड यूज़ प्लॅनिंग देशभरातील पीक विविधता आणि पीक पद्धतींचा अभ्यास करेल.
3. राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था (MANAGE) च्या प्रतिनिधीच्या नेतृत्वाखाली सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती पद्धतींसह शून्य बजेट आधारित शेतीचा अभ्यास करेल आणि शेतकऱ्यांमध्ये एकमत निर्माण करेल.
4. आयआयएम-अहमदाबादचे सुखपाल सिंग यांच्या नेतृत्वाखालील सूक्ष्म सिंचनावरील दुसरा गट सूक्ष्म सिंचन शेतकरी केंद्रित करण्यासाठी अभ्यास करेल .सध्या सरकारच्या अनुदानातून सूक्ष्म सिंचन चालवले जाते आणि त्यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी कशी निर्माण करता येईल, याचे परीक्षण हा गट करणार आहे.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18
Next Post

तुमच्याकडे रिकामा वेळ असेल तर 'ही'कामे करा, नक्की फायदा होईल!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.