MLA Rohit Pawar News : पुणे : राज्यातील बेरोजगार युवकांचे अनेक समस्या व प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडविल्या जाव्यात. त्यातून युवकांना मुख्य समस्या बेरोजगारी बाबत सोडविण्यात यश यावे. यासाठी राजकारणाच्या पलिकडे लोकहितासंबधी लक्षवेदी सुचना विधानसभेच्या सभागृहात मजबूतपणे पुराव्या सहित सादर करणारे आमदार रोहित पवार हे कर्तव्यदक्ष आहेत. त्यामुळे राज्यातून युवकांचा आमदार असाच नावलौकीक त्यांच्या पाठिशी उभा राहू लागला आहे.(MLA Rohit Pawar News)
राजकारणाच्या पलिकडे लोकहितासंबधी लक्षवेदी सुचना.
हडपसर पुणे येथे कुस्ती मल्लविद्या संस्थेचे अध्यक्ष व उपमहाराष्ट्र केसरी बबनराव काशीद यांच्या हस्ते त्यांचा नुकतेच सत्कार करण्यात आला. युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे ते युवकांचे आमदार असल्याचे सांगण्यात आले.(MLA Rohit Pawar News)
विधानसभेच्या अधिवेशनात बेरोजगारीमुळे युवकांच्या हाताला काम मिळत नाही. त्यासाठी राज्यात गुंतवणूक वाढवली पाहिजे. त्याउलट गुजरात मध्ये कंपन्या गेल्याने लाखो तरूणांचा रोजगार हिरावला गेला. महाभरतीच्या नावाखाली फि च्या नावाखाली कोट्यावधी रूपयांचा निधी गोळा केला जातो. पण तरूणांना रोजगार मिळत नाही. या बाबत खडे बोल सुनावण्यात आल्याने लोकहितसंबधी लक्षवेधी त्यांनी मांडली होती.(MLA Rohit Pawar News)