पुणे : प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांना नाशिक महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनावर हात उचलणे चांगलेच महागात पडले आहे. आमदार कडू यांना सरकारी कामात आडथळा आणल्याप्रकरणी नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वेगवेगळ्या प्रकारणात दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात बच्चू कडू यांचा तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला आहे. वरच्या कोर्टात अपीलाच्या कालावधी पर्यंत त्यांना जामीन मिळाला आहे. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर बच्चू कडू यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.
नाशिक महापालिकेत अपंगांच्या मागण्यांसाठी २०१७ सालीआंदोलन सुरु होते. तेव्हा तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारणे, धमकावणे आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदर बच्चू कडू यांच्यावर होता. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते.
हे प्रकरण नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुरु होते. न्यायालयाने आमदार कडू यांना दोषी ठरवून २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामध्ये सरकारी कामात अडथळा
आणल्याप्रकरणी १ वर्ष , तर सरकारी अधिकाऱ्याला अपमानित केल्याप्रकरणी १ अशी २ वर्षांची शिक्षा ठोठाविली आहे. मात्र त्यांना जामीन मंजूर झाल्याने दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, बच्चू कडू हे तीन वेळा आमदार अचलपूर मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून पुन्हा निवडून आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास
आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून कडू हे राज्यमंत्री म्हणून नियुक्त झाले होते. ठाकरे गटाची साथ सोडत ते आता शिंदे गटासोबत गेले आहेत.