शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळाच्या विस्ताराकडे आमदार डोळे लावून बसले आहेत. मात्र मंत्रीमंडळाचा विस्तार लांबणीवर पडत आहे.. मात्र नाराजी असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व आमदार बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. (Ministerial status to MLA Bachu Kadu! displeasure away ???)
मंत्रीमंडळाचा विस्तार होत नसल्याने सरकारचे मित्र पक्ष असलेले नेते उघड उघड नाराजी व्यक्त करत आहेत. आमदार बच्चू कडू यांनी तर थेट सरकारला घरचा आहेर दिला होता. दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा होऊन ही मंत्री पद देण्यात नआल्याने बच्चू कडू नाराज असल्याचे बोलले जाते होते.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार हा मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर सातत्याने बोट ठेवून शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर देणारे बच्चू कडू यांना शांत करण्याचा किंवा त्यांची नाराजी दूर करण्याचा हा एक प्रयत्न असल्याची चर्चा यामुळे राजकीय वर्तूळात सुरु झाली आहे.
म्हणून मंत्रिपदाचा दर्जा……
राज्यात जून महिन्यात दिव्यांग कल्याण विभागाद्वारे ‘दिव्यांगाच्या दारी’ अभियान राबवण्यात येणार आहे. यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून समितीचे अध्यक्ष पद आणि प्रमुख मार्गदर्शक हे आमदार बच्चू कडू यांना दिले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. शासनाने यासंबधी परिपत्रक काढून कडू यांना मंत्री पदाचा दर्जा जाहीर केला आहे. मागील वीस वर्षांपासून बच्चू कडू हे दिव्यांगांसाठी लढा देत आहेत. त्यांच्याच रेट्यामुळे राज्यात स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्यात आला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Politics News : बोरीऐंदी गावच्या सरपंचपदी सविता भोसेकर यांची बिनविरोध निवड..
Politics | उद्धव ठाकरे गटाला धक्का ! जिल्हाप्रमुख महेश पासलकरांचा शिंदे गटात प्रवेश…
Pune News : धक्कादायक! पुण्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल..