अजित जगताप
सातारा : राजकीय पटलावर अल्पावधीतच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देशपातळीवर ठसा उमटवला आहे. त्यामुळे युवा पिढी मनसे पक्षात मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होत आहेत.साताऱ्यात मनसेच्या ऑनलाईन सदस्य नोंदणीला भरघोस पाठिंबा मिळत असून मनसे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाबाबत शिक्कामोर्तब झाला आहे.
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग असलेल्या माण- खटाव, फलटण या तालुक्यात मनसे पक्षाच्या वतीने डिजिटल फ्लेक्स लावण्यात आले असून मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदस्य नोंदणी केली जात आहे. गोंदवले ता माण येथे आयोजित केलेल्या ऑनलाइन सदस्य नोंदणीला युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
ऑनलाइन नोंदणीसाठी सार्वजनिक ठिकाणी पक्ष वाढीसाठी स्वखर्चाने डिजिटल फ्लेक्स लावून त्यावर क्यू आर कोड लावण्यात आले आहेत. मोबाईल द्वारे ही मनसे सभासद नोंदणी केली जात आहे.
युवकांनी जास्तीत जास्त प्रमाणात नोंदणी करून मनसेचे सदस्य होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.त्यावेळी मनसे पदाधिकारी तसेच महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, ‘राज’नीती मत करो डरसे, अपना लो खुल कर ‘मनसे’ या घोषवाक्याने देशपातळीवर मनसे ने हिंदुत्ववादी विचारांची देवाणघेवाण सुरू केली आहे. त्यामुळे हिंदू बांधवांना मनसे जवळचा पक्ष वाटू लागला आहे.