राहुलकुमार अवचट
यवत : दौंड तालुका ग्रामीण भागातील नागरिकांना लोकशाहीच्या मार्गाने न्याय मिळवुन देण्याची व समाज सेवेत कार्यरत असलेल्या सामाजिक, राजकीय , कार्याची दखल घेऊन, पुणे जिल्हा अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या संघटनावाढी यवत ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्या मनिषा सोमनाथ रायकर यांची दौंड तालुका अध्यक्षपदी तर मनिषा लक्ष्मण खुटाळे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. हडपसर येथील एका कार्यक्रमात मनिषा रायकर व मनिषा खुटाळे यांना नुकतेच नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे.