(Maharashtra Budget 2023) मुंबई – शिंदे-फडणवीस (shinde goverment) सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले होते. आज (गुरुवारी) अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात फडणवीस यांनी महिला आणि बालक यांच्या बद्दल अर्थसंकल्पातील विविध तरतुदी जाहीर केल्या. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पात शिंदे (shinde) सरकारकडून आरोग्य विभागाच्या योजनेसाठी अर्थसंकल्पात (budget) मोठी तरतुद केल्याचे जाहीर केले.
जन सामान्यांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या कमाल मर्यादेत शिंदे सरकारकडून वाढ (increase limit)करण्यात आली असल्याचे फडणवीसांनी सांगितले. महात्मा फुले आरोग्य योजनेची वर्षभरातील मोफत उपचारांची कमाल मर्यादा ही दीड लाखांवरून 5 लाखांवर रुपये करण्यात आली आहे. अशी घोषणा फडणवीस यांनी अर्थसंकल्पातून केली. तसेच आरोग्य विभागासाठी एकूण 3,520 कोटी रुपये जाहीर करण्यात आले.
आरोग्य विभागाच्या योजनेसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतुद…
महात्मा फुले जन आरोग्य योजनेत कमाल मर्यादेत वाढ करण्यासोबतच राज्यातील नवीन 200 रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्यात येणार असून मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी 4 लाखापर्यंत लाभ मिळेल. तसेच राज्यभरात 700 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येईल, असेही घोषित केले.
महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 सध्या मुंबईत सुरु आहे. आज (गुरुवार, 9 मार्च) रोजी अधिवेशनाचा सातवा दिवस होता. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. तसेच, दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर केला.
फडणवीस यांनी अर्थसंकल्प तयार करताना जनतेच्या सूचना मागवल्या होत्या, तसेच अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता, त्यामुळे अर्थसंकल्पात नेमक्या काय घोषणा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Ajit Pawar News : विरोधी पक्षनेते अजित पवारांनी शिंदे-फडणवीसांना घेरलं
पुण्यासह मुंबईत शिंदे गटाची बॅनरबाजी ; उद्धवचा वाटा महाराष्ट्राचा घाटा