मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार असून 20 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. अशातच महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने रविवारी (दि.10) रात्री आगामी निवडणुकीपूर्वी पक्षाची शिस्तभंग करणा-यांवर कारवाई केली आहे.
काँग्रेसने 7 बंडखोर उमेदवारांवर कारवाई केली आहे. बंडखोरी करत विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या सुचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. कॉंग्रेस नेते रमेश चेन्निथला यांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणा-या कॉंग्रेसच्या 16 बंडखोर उमेदवारांना सहा वर्षासाठी निलंबित केले आहे.
यामध्ये शिलू चिमुरकर, सोनल कोवे, आनंदराव गेडाम, भरत येरमे, अभिलाषा गावतुरे, प्रेमसागर, गणवीर, अजय लांजेवार, विलास पाटील, आस्मा जावद चिखलेकर, हंसकुमार पांडे, कमल व्यवहारे, मोहनराव दांडेकर, मंगलराव दांडेकर यांचा समावेश आहे. तसेच मनोज शिंदे, सुरेश पाटील खेडे, विजय खडसे, शाबीर खान, अविनाश लाड, याज्ञवल्य जिचकार, राजू झोडे, राजेंद्र मुका, शामकांत सनेर, राजेंद्र ठाकूर, आबा बागुल, मनीष आनंद, सुरेश कुमार जेथलिया, कल्याण बोराडे आणि चंद्रपॉल चौकसे या सर्वांना पक्षातून 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.
Maharashtra polls: Congress suspends seven more rebel candidates
Read @ANI Story | https://t.co/xxaB4458p1#Maharashtrapolls #Congress #MaharashtraPradeshCongressCommittee pic.twitter.com/JuJvxXPbS5
— ANI Digital (@ani_digital) November 11, 2024