(Loni Kalbhor News) लोणी काळभोर, (पुणे) : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी योगेश प्रल्हाद काळभोर यांची गुरुवारी (ता. १३) बिनविरोध निवड झाली आहे. यापूर्वीचे सरपंच माधुरी राजेंद्र काळभोर यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे हि निवडणूक घेण्यात आली होती. हडपसर येथील अध्यासी अधिकारी तथा मंडल अधिकारी व्यंकटेश चीरमुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली.
गुलाल व फटाक्यांच्या अतिषबाजीने मोठा जल्लोष…!
सरपंच पदासाठी योगेश काळभोर यांचा एकमेव अर्ज आल्याने व्यंकटेश चीरमुल्ला यांनी काळभोर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. योगेश काळभोर यांची बिनविरोध निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलाल व फटाक्यांच्या अतिषबाजी करीत मोठा जल्लोष करण्यात आला. यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, माजी सरपंच माधुरी काळभोर व मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच योगेश काळभोर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलास काळभोर, साधना सहकारी बॅंकेचे सुभाष काशिनाथ काळभोर, बाजार समितीचे माजी संचालक शिवदास काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, हवेलीचे माजी उपसभापती सनी काळभोर, उपसरपंच ललिता काळभोर, माजी उपसरपंच अण्णासाहेब काळभोर, संगीता काळभोर, ग्रामविकास अधिकारी जालिंदर बोरवने, ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, भरत काळभोर, सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर, अमित काळभोर गावकामगार तलाठी मोरे मॅडम आदी उपस्थित होते.
निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच योगेश काळभोर म्हणाले, “लोणी काळभोर गावच्या उर्वरित विकासासाठी गट- तट बाजूला ठेवून गावच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे. लोणी काळभोर गावासाठी राहिलेल्या उर्वरित कामासाठी वाढीव निधी मंजूर करून आणण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार आहे.”