Loni Kalbhor News लोणी काळभोर, (पुणे) : बॅरिस्टर असलेल्या सावरकरांची ८३ वर्ष आयुष्यातील २८ वर्षे काळकोठडीत गेली. त्यांनी २२ हजार पानांचे साहित्य लिहिले. अशा सावरकरांच्या त्यागाची किंमत देशाने ठेवली नाही. सावरकरांवर आरोप करून कॉंग्रेसकडून हिंदुचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न गेली अनेक वर्षे सुरू आहे. ते मरण पावल्यानंतरही त्यांच्या नावाची दहशत आजही आहे, म्हणूनच दररोज त्यांच्यावर टीका केली जात असल्याचे मत सिने अभिनेते व व्याख्याते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र दिनानिमित्त जनहित सोशल फाउंडेशन यांच्या वतीने कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (ता. २) ”स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार दर्शन” या विषयावर शरद पोंक्षे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे होते.
यावेळी जनहित सोशल फौंडेशनचे अध्यक्ष प्रविण काळभोर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक रोहिदास उंद्रे, सुदर्शन चौधरी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव, भाजपा हवेली तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे संचालक स्वप्निल उंद्रे, भाजपा सोशल मिडियाचे जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे, अनिल टिळेकर, राजेंद्र हाजगुडे, विशाल वेदपाठक, विशाल गुजर, बाबासाहेब गायकवाड, गुरुदत्त जाधव, मल्हार पांडे, अवधूत कोंढाळकर, दत्ता अंबुरे, राहुल थोरात, जगन्नाथ लडकत, सचिन काळभोर, पुष्पराज गुप्ता, शेखर गुंजभारे, नितीन टिळेकर, शिवाजी खांडसोळे, अविनाश बडदे, उदय काळभोर, प्रदीप गुजर, आदी फाउंडेशन पदाधिकारी, मान्यवर, व ग्रामस्थ उपस्थित होते.
पोंक्षे म्हणाले…!
”निसर्गाने दिलेले गुणधर्म पाळणे हाच खरा धर्म आहे. राहुल गांधीनी न्यायालयात चार वेळा माफी मागितली, मात्र त्यांनी कोणीही माफीवीर म्हणत नाही. मनुस्मृती लिहीणारा मनु किंवा रामायण, महाभारत लिहिणारे ऋषी ब्राह्मण नव्हते. म्हणून सर्वांनी आपले धर्मग्रंथ वाचले पाहिजेत.”
चार वर्ण हे कामाच्या विभागणीसाठी तयार केलेले आहेत. माणसाने माणसाशी माणूसकीने वागणे म्हणजेच माणूसकी धर्म. हाच माणूसकी धर्म हिंदु धर्म शिकवतो. म्हणूनच हिंदु धर्मात “वसुधैवं कुटुंबकम्” हि संकल्पना आहे, मात्र कुठल्याही दुस-या धर्मात ही संकल्पना नाही. हिंदु धर्म सोडून मुस्लिम, ख्रिश्चन आदी धर्मांना संस्थापक आहेत. हिंदु धर्माचा कुणीही संस्थापक नाही. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, जेष्ठ हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे, प्रथम महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी, जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज हभप शिवाजी महाराज मोरे, कार रेसर निकिता टकले, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल निखिल लांडगे, किरण पोपळघट, निलेश शिवरकट, पूजा पवार, स्नेहल थेऊरकर यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान, हभप शिवाजी महाराज मोरे, प्रतिक्षा बागडी, डॉ. रामचंद्र साबळे, मंगेश चिवटे, गणेश भेगडे यांनीही आपआपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनहित सोशल फौंडेशनचे अध्यक्ष प्रवीण काळभोर यांनी तर उपस्थितांचे आभार मल्हार पांडे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध व्याख्याते शशांक मोहिते यांनी केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Loni Kalbhor : लोणी स्टेशन येथील भाजीविक्रेत्यांची मुलगी झाली पोलीस दलात भरती