पुणे : सगळीकडे लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha elections) तयारी जोरदार सुरू झाली आहे. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचा (NCP SP) लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election) साठी शपथनामा आज प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये अनेक घोषणा केल्या आहेत.
यामध्ये महिला, तरुण, तसेच कामगार यांच्यासह जातनिहाय जनगणना, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव यांच्यासह अनेक मुद्द्यांचा समावेश करण्यात आला. वंदना चव्हाण यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा तयार करण्यात आला. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी लोकं जाहीरनामा तयार करणाऱ्या समितीत आहेत.
#WATCH | Pune, Maharashtra: NCP-SCP chief Sharad Pawar releases party’s manifesto, for Lok Sabha elections. https://t.co/AkUtVjm5qK pic.twitter.com/endlJcTRzt
— ANI (@ANI) April 25, 2024
यावेळी जयंत पाटील बोलताना म्हणाले, आज आमचा जाहीरनामा प्रसिद्ध करतोय, जे मुद्दे जाहीरनाम्यात समाविष्ट आहेत, ते मुद्दे आमचे नेते संसदेत मांडणार आहेत. आमचा जाहीरनामा ‘शपथपत्र’ या नावाने प्रसिध्द करण्यात आला आहे. आम्ही एलपीजी गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करू. तसेच आम्ही सत्तेत आलो तर सरकारी नोकऱ्यांमधील रिक्त जागा भरणार आहोत. महिला आरक्षणावर काम करू तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदे आणले जातील.
यावेळी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा लोकसभा निवडणुकीसाठीचा शपथनाम्यातील काही गोष्टी वाचून दाखवल्या.
– अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवू
– सरकार आल्यावर कंत्राटी नोकरी भरती बंद करु
– शेतकऱ्यांसाठी स्वंतत्र आयोग स्थापन करु
– स्पर्धा परिक्षांसाठी आकारले जाणारे शुल्क माफ करु
– आरक्षणाची ५० टक्यांची अट बदलू
– खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण
– महिला, मुलींच्या सुरक्षेसाठी कडक कायदे करु
– आरोग्यासाठी उत्तम सेवा देऊ
– शेती, शैक्षणिक वस्तुंवर जीएसटी आकारणार नाही.
– सत्तेत आल्यावर जातीनिहाय जनगणना करु
– जेष्ठ नागरीकांसाठी आयोगाची स्थापना करु
– शिक्षणाची अर्थसंकल्पीय तरतुद सहा टक्यांपर्यत करु
– शेती आणि शैक्षणिक वस्तुंवर शुन्य टक्के जीएसटी ठेवणार
– अग्निवीर योजना रद्द करणार
– महिलांना विधानसभा लोकसभेत आरक्षण देण्याचा प्रयत्न करणार
– शासकीय क्षेत्रात कंत्राटी कामगारांना पायबंद घालणार