लहू चव्हाण
पाचगणी : भारती विद्यापीठ गॉड्स व्हॅली इंटरनॅशनल स्कूल पांचगणी येथे भारती विद्यापीठाचे संस्थापक काॅंग्रेसचे दिवंगत नेते, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांची ७९ वी जयंती विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील गॉड्स व्हॅली इंटरनॅशनल स्कूलमधील सभागृहात शिक्षक व विद्यार्थ्यांनी डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वाई येथील पी. सी. अलवाणी मतीमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मिठाईचे वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ. पतंगराव कदम यांचे शैक्षणिक, सामाजिक व राजकीय कार्य आणि भारती विद्यापीठ व भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत गॉड्स व्हॅली इंटरनॅशनल स्कूल मधील विविध वयोगटातील ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विद्या निकेतन येथील शिक्षिका तृप्ती कांबळे काम पाहिले.
भारती विद्यापीठ शालेय शिक्षण विभागाच्या अध्यक्षा विजयमाला कदम (वहिनीसाहेब) यांच्या कृपाशीर्वादाने, भारती विद्यापीठाचे कार्यवाह, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, नामदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या प्रेरणेने, संचालक एम.डी. कदम सर व डॉ. अरुंधती निकम यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य कुर्माराव रेपाका व सहकारी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.