Koregav Mul News उरुळी कांचन : कोरेगावमूळ (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीचे सरपंच विठ्ठल शितोळे यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. त्याच ठरावावर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालावर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती तात्काळ उठविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यानुसार, आता उपसरपंच यांच्याकडे कामकाज कायम राहणार आहे. (Koregav Mul News)
कोरेगावमूळ ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी सरपंच विठ्ठल शितोळे यांच्याविरोधात २१ फेब्रुवारी रोजी १० विरुद्ध ३ अशा फरकाने अविश्वास ठराव दाखल केला होता. या ठरावाविरुद्ध सरपंच विठ्ठल शितोळे यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे अपिल दाखल केले होते. या अपिलात ४ ग्रामपंचायत सदस्यांनी जातपडताळणी प्रमाणपत्रक दाखल न केल्याने त्यांना अविश्वास ठरावात अपात्र करावे. त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करुन अविश्वास ठराव प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली होती. (Koregav Mul News)
दरम्यान, पुणे जिल्हाधिकारी यांनी या अपिलाची मागणी २३ मार्च रोजी फेटाळून लावली होती. पुणे जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्णयावर सरपंच विठ्ठल शितोळे यांनी १७ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात स्थगिती मिळविली. (Koregav Mul News)
या निर्णयावर पुन्हा एकदा ग्रामपंचायत सदस्य भानुदास जेधे यांनी न्यायालयाच्या अविश्वास ठराव स्थगिती प्रक्रियेला न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुनिल शुक्रे व राजेश पाटील यांच्या न्यायालयाने १७ जुलै रोजी दिलेली स्थगिती उठवली आहे. (Koregav Mul News)