Kolhapur News : कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या घटनेनंतर कोल्हापुरात मोठा हिंसाचार झाला आहे. कोल्हापुरातील मुख्य चौकात दोन गटात राडा झाल्यानंतर आज हिंदुत्ववादी संघटनांनी आज घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारला आहे. जमावबंदीचे आदेश झुगारून हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी हजारो लोक मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा सुरू असतानाच आंदोलकांना पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी अखेर या मोर्चावर लाठीमार केला. कोल्हापुरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात दंगील घडवून आणण्याचे प्रयत्न होत असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे. (Kolhapur violence! Leader of Opposition Ajit Pawar’s reaction)
शांततेनं प्रश्न सोडविण्याचे केले आवाहन
अजित पवार म्हणाले, राज्यात दंगली घडवून आणण्याचे प्रयत्न होत आहेत. असे सांगत कायदा हातात घेऊ नका, शांततेनं प्रश्न सोडवा असं आवाहन त्यांनी केलं.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून द्वेष निर्माण केला जातोय का? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. हिंसाचार टाळण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. (Kolhapur News) बंदची हाक दिल्यामुळे शांततेसाठी बैठक घ्यायला हवी होती. कोल्हापुरातील घटनेमागे कोण आहे याचा सरकारने छडा लावावा. तसेच पोलिसांना फ्री हँड द्यायला हवा असेही अजित पवारांनी म्हटले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Kolhapur News : कोल्हापूर हिंसाचार! दूरसंचार कंपन्यांना इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश