पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षा केशर सदाशिव पवार यांची महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे (महानंद) संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
केशर पवार यांना या निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या प्रभारी व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधुरी ढमाले यांनी नुकतेच दिले आहे. केशर पवार यांची चालकपदी बिनविरोध झाल्यानंतर पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक व कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे स्थापनेमध्ये पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचा मोठा सहभाग असून सर्वात जास्त भाग भांडवल पुणे दूध संघाचे आहे.