Karnataka Election | बंगळुरू : कर्नाटकात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपने कर्नाटकातील सत्ता गमावल्याने जवळपास आता निश्चित झाले आहे. काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचे कल समोर आले आहेत.
काँग्रेसने 130 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपला अवघ्या 65 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहेत.जेडीएसनेही 22 जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतर पक्षांना केवळ 7 जागा मिळताना दिसत आहे. राज्यात बहुमतासाठी 113 संख्याबळ आवश्यक आहे. त्याच्याही पेक्षा काँग्रेसने अधिक जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस कर्नाटकात स्वबळावर सत्ता स्थापन करू शकेल, अशी परिस्थिती आहे.
काँग्रेसला बहुमतापेक्षा अधिक जागा मिळताना दिसत असल्याने राज्यात कोणताही पक्ष किंगमेकरची भूमिका निभावणार नसल्याचं स्पष्ट होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Traffic | वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी; या भागातील वाहतूकीत तात्पुरते बदल